लोंढरी (ता. जामनेर) — येथील स्वर्गवासी सुनील काशिनाथ पाटील (वय फक्त ४५) यांच्याकडे LIC ची जीवन विमा पॉलिसी होती. अल्पशा आजारानंतर त्यांचे दुर्दैवी निधन झाले

लोंढरी (ता. जामनेर) — येथील स्वर्गवासी सुनील काशिनाथ पाटील (वय फक्त ४५) यांच्याकडे LIC ची जीवन विमा पॉलिसी होती. अल्पशा आजारानंतर त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर अवघ्या १५ दिवसांच्या आतच LIC कडून त्यांच्या कायदेशीर वारस व पत्नी श्रीमती सुलोचनाबाई सुनील पाटील यांना दिनांक १५ मार्च २०१७ रोजी मृत्यू दावा मंजूर करून धनादेश प्रदान करण्यात आला. अतिशय कमी कालावधीत पूर्ण झालेली ही दावा प्रक्रिया विशेष उल्लेखनीय ठरली.
स्वर्गवासी पाटील यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

       सदर विमा दाव्याचा धनादेश प्रदान कार्यक्रम गावातील पोलीस पाटील सौ. निता चौधरी यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक व भावनिक वातावरणात पार पडला.

      या प्रसंगी गावातील मान्यवर श्री. सुरेश सीताराम पाटील, श्री. मधुकर पाटील, श्री. विनोद नामदेव पाटील तसेच मुख्य विमा सल्लागार श्री. अविनाश चौधरी साहेब उपस्थित होते.
         LIC च्या जीवन विमा योजनेमुळे दुःखद व कठीण काळात कुटुंबाला मिळालेला हा त्वरित, विश्वासार्ह व भक्कम आर्थिक आधार उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. या घटनेतून जीवन विम्याचे महत्त्व, विश्वासार्हता व सामाजिक उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *