येथील स्वर्गवासी श्याम शंकर चौधरी (वय 48 वर्ष) यांच्याकडे LIC ची जीवन विमा पॉलिसी होती. अत्यंत कमी वयात झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनानंतर

शेंदुर्णी (ता. जामनेर) — येथील स्वर्गवासी श्याम शंकर चौधरी (वय 48 वर्ष) यांच्याकडे LIC ची जीवन विमा पॉलिसी होती. अत्यंत कमी वयात झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनानंतर LIC कडून त्यांच्या कायदेशीर वारस व पत्नी श्रीमती ज्योती श्याम चौधरी यांचा दिनांक – 05/05/2023 मृत्यू दावा मंजूर करून मृत्यू दाव्याची संपूर्ण रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.

सदर विमा दाव्याच्या लाभाबाबतचा सन्मान सोहळा गावातील मान्यवर श्री. भानुदास शेनफडू चौधरी, यशोदाबाई भानुदास चौधरी, सविता अविनाश चौधरी, विमाप्रतिनिधी ज्योती मेढे, विशाल वारुळे तसेच मुख्य विमा सल्लागार श्री. अविनाश अशोक चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत सन्मानपूर्वक व भावनिक वातावरणात पार पडला.

या प्रसंगी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुःखद व कठीण काळात LIC च्या जीवन विमा योजनेमुळे कुटुंबाला मिळालेला हा त्वरित, विश्वासार्ह आणि मोलाचा आर्थिक आधार उपस्थितांच्या मनाला खोलवर स्पर्श करून गेला.

या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की –
👉 जीवन विमा म्हणजे केवळ कागदोपत्री पॉलिसी नसून, संकटाच्या क्षणी कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणारा खरा, विश्वासार्ह आधार आहे हे पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित झाले.