दिनांक 18 जुलै 2018 मोयखेडा दिगर (ता. जामनेर) — येथील स्वर्गवासी भागवत पांडुरंग सोनवने यांच्याकडे LIC ची जीवन विमा पॉलिसी होती. त्यांच्या निधनानंतर LIC कडून त्यांच्या कायदेशीर वारस व पत्नी श्रीमती मंगलाबाई भागवत सोनवने यांना मृत्यू दावा मंजूर करून धनादेश प्रदान करण्यात आला.
सदर विमा दाव्याचा धनादेश प्रदान कार्यक्रम गावातील सरपंच सौ. विजया सुनील नानोटे यांच्या शुभहस्ते तसेच मुख्य विमा सल्लागार श्री. अविनाश अशोक चौधरी साहेब यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक व भावनिक वातावरणात पार पडला.
या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुःखद व कठीण काळात LIC च्या जीवन विमा योजनेमुळे कुटुंबाला मिळालेला हा त्वरित, विश्वासार्ह व मोलाचा आर्थिक आधार उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला. या घटनेतून जीवन विमा म्हणजे कुटुंबासाठीचा खरा आधार आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

