शेंदूर्णी (ता. जामनेर) — येथील स्वर्गवासी संजय वामन चौधरी यांच्या निधनानंतर LIC कडून त्यांच्या कायदेशीर वारस व पत्नी श्रीमती मंगलाबाई संजय चौधरी यांना जीवन विमा पॉलिसीचा मृत्यू दावा त्वरित मंजूर करून धनादेश प्रदान करण्यात आला. कमी कालावधीत पूर्ण झालेली ही दावा प्रक्रिया विशेष उल्लेखनीय ठरली.
सदर विमा दाव्याचा धनादेश प्रदान कार्यक्रम सन्मानपूर्वक व भावनिक वातावरणात पार पडला.
या प्रसंगी मन्यवर अमृत चौधरी, सुपडाबाई दशरथ चौधरी, संजय भिकारी बाठे तसेच मुख्य विमा सल्लागार श्री. अविनाश अशोक चौधरी साहेब उपस्थित होते.
दुःखद व कठीण काळात LIC च्या जीवन विमा योजनेमुळे कुटुंबाला मिळालेला हा त्वरित, विश्वासार्ह व मोलाचा आर्थिक आधार उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला.
या घटनेतून जीवन विमा म्हणजे केवळ गुंतवणूक नसून कुटुंबासाठीचा खरा आधार आहे, हे पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले.

