मोयखेडा दिगर (ता. जामनेर) — येथील स्वर्गवासी स्वप्नील मनोहर जोशी (वय ३१ वर्ष) यांच्या LIC चा मृत्यू दाव्याचा धनादेश देतांना…

दिनांक – 28/04/2024 मोयखेडा दिगर (ता. जामनेर) — येथील स्वर्गवासी स्वप्नील मनोहर जोशी (वय ३१ वर्ष) यांच्याकडे LIC ची जीवन विमा पॉलिसी होती. अत्यंत कमी वयात झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनानंतर LIC कडून त्यांच्या कायदेशीर वारस व पत्नी श्रीमती रेणुका स्वप्नील जोशी यांचा मृत्यू दावा मंजूर करून मृत्यू दाव्याची संपूर्ण रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.
सदर विमा दाव्याच्या लाभाबाबतचा सन्मान सोहळा गावातील मान्यवर श्री. सुनील चौधरी, श्री. प्रमोद बाठे, श्री. दत्तात्रय खुरपडे, श्री. राजेंद्र चौधरी, श्री. रतन चौधरी, श्री. भास्कर नानोटे, श्री. दिनकर चौधरी, भगवान नानोटे श्री. उत्तम काशीराम चौधरी, राजाराम काकडे तसेच मुख्य विमा सल्लागार श्री. अविनाश अशोक चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत सन्मानपूर्वक व भावनिक वातावरणात पार पडला.
या प्रसंगी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुःखद व कठीण काळात LIC च्या जीवन विमा योजनेमुळे कुटुंबाला मिळालेला हा त्वरित, विश्वासार्ह आणि मोलाचा आर्थिक आधार उपस्थितांच्या मनाला खोलवर स्पर्श करून गेला.
या घटनेतून जीवन विमा म्हणजे केवळ कागदोपत्री पॉलिसी नसून, संकटाच्या क्षणी कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणारा खरा, विश्वासार्ह आधार आहे हे पुन्हा एकदा ठामपणे अधोरेखित झाले.